Screenshot 2025 0905 210021

Maharashtra MBBS BDS Stray Vacancy Round 1 चे वेळापत्रक आले पाहा Cutoff, पात्रता, लागणारी कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती

महाराष्ट्र आरोग्य संचालनालयाने (DMER) NEET-UG 2025 साठी MBBS आणि BDS (Group-A) अभ्यासक्रमांच्या Stray Vacancy Round 1 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. CAP Round-3 नंतर उरलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी ही ऑनलाईन प्रक्रिया राबवली जाणार आहे. जिल्हास्तरीय, शासकीय, महापालिका तसेच खाजगी व अल्पसंख्याक महाविद्यालयांत उपलब्ध असलेल्या जागांसाठी पात्र उमेदवारांनी वेळेत ऑनलाइन choice भरणे आवश्यक आहे.

महत्त्वाची नोंद: Stray Vacancy Round 1 साठी नवीन नोंदणी घेतली जाणार नाही. CAP Round-3 मध्ये भरलेले पर्याय अमान्य होतील — त्यामुळे या फेरीसाठी नवीन choice भरावी लागतील. Stray Round मध्ये मिळालेली सीट अनिवार्य जॉईन करावी लागेल.

Stray Vacancy Round 1 – वेळापत्रक (MBBS/BDS)

क्र. कार्य दिनांक
1 Seat Matrix प्रकाशित 11 नोव्हेंबर 2025
2 ऑनलाईन प्राधान्य/Choice भरनेची प्रक्रिया (CAP-3 मध्ये भरलेले पर्याय अमान्य) 12–13 नोव्हेंबर 2025 (रात्री 11:59 पर्यंत)
3 Stray Vacancy Round-1 निवडयादी जाहीर 14 नोव्हेंबर 2025
4 मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष सामील होणे व फी भरणे (DD/Cheque) 15–17 नोव्हेंबर 2025 (सायं 5:30 पर्यंत)
5 शिक्का न काढता सीट निरोपण्याची अंतिम तारीख (Penalty शिवाय) 17 नोव्हेंबर 2025

पात्रता व अपात्रता

पात्र उमेदवार: NEET UG 2025 पास असलेले आणि CAP Round-3 पर्यंत सीट न मिळालेली नोंदणीकृत उमेदवार. तसेच माहिती पुस्तिकेतील कलम 4 नुसार पात्र असणे आवश्यक.

अपात्र उमेदवार: Round 1, Round 2 किंवा CAP Round-3 मध्ये सीट मिळवून प्रवेश घेतलेले; All India Quota च्या राउंडमध्ये प्रवेश घेणारे; किंवा Round 3 मध्ये सीट मिळवूनही जॉईन न केलेले उमेदवार.

महत्त्वाच्या सूचना

  • या फेरीसाठी नवीन नोंदणी (New Registration) घेतली जाणार नाही.
  • CAP-3 मध्ये भरलेल्या पर्यायांना शून्य केले जाईल; Stray Vacancy Round साठी नवीन choice भरावी लागतील.
  • Stray Vacancy Round मध्ये मिळालेली सीट अनिवार्य जॉईन करणे आवश्यक आहे. म्हणून फक्त त्या कॉलेजचे पर्याय भरा ज्यात तुम्ही खरंच प्रवेश घेणार आहात.
  • विविध प्राधिकरणांच्या (MCC/AACCC/सरकार/न्यायालय) आदेशांनुसार वेळापत्रक बदलू शकते — म्हणून DMER ची अधिकृत वेबसाइट वेळोवेळी तपासा.

📊 विशेष माहिती आणि Cutoff विश्लेषण

काही वृत्तपत्रांमध्ये आलेल्या माहितीनुसार, Maharashtra MBBS साठी सध्या सुमारे 350 जागा रिक्त आहेत, तर BDS अभ्यासक्रमासाठी अंदाजे 500 जागा शिल्लक आहेत. मात्र या जागांपैकी बहुतांश जागा खाजगी (Private) महाविद्यालयांतील असून, सरकारी (Government) जागा तुलनेने कमी आहेत. खाजगी महाविद्यालयांमध्ये देखील Institutional Quota (IQ) च्या जागांची संख्या अधिक आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना शासनाची शिष्यवृत्ती (Scholarship) लागू होत नाही.

त्यामुळे वरकरणी पाहता जागा जास्त असल्याचे दिसत असले तरी कमी फीच्या (Low Fee) सीट्स फारच कमी आहेत. अशा परिस्थितीत Stray Vacancy Round मध्ये मुख्यतः Open, OBC, EWS, SC, ST अशा श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी Cutoff खाली येण्याची शक्यता अधिक आहे. मात्र BDS अभ्यासक्रमामध्येही बहुतांश जागा Institutional Quota अंतर्गत असल्यामुळे, तिथे Cutoff मध्ये मोठी घट होण्याची शक्यता तुलनेने कमी मानली जात आहे.

विद्यार्थ्यांनी या पार्श्वभूमीवर आपल्या प्राधान्यक्रमांचा (Choice Filling) विचार करून निर्णय घ्यावा. विशेषतः कमी फी व शिष्यवृत्ती उपलब्ध असलेल्या कॉलेजेस ओळखून योग्य पर्याय भरणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण Stray Vacancy Round मध्ये मिळालेली सीट जॉईन करणे बंधनकारक असल्यामुळे, चुकीचा पर्याय दिल्यास पुढील प्रवेश संधी गमावण्याचा धोका संभवतो.

एकूणच पाहता, Maharashtra MBBS BDS Stray Vacancy Round 1 हा NEET-UG 2025 मध्ये प्रवेशाची शेवटची आणि निर्णायक संधी ठरणार आहे. योग्य नियोजन, काळजीपूर्वक choice filling आणि वेळेत कागदपत्रे सादर करणे यावर प्रत्येक विद्यार्थ्याचे वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न अवलंबून आहे.

🔗 संबंधित महत्वाचे दुवे

जर तुम्हाला Maharashtra MBBS BDS Round 1, 2 आणि 3 चा Cutoff पाहायचा असेल तर तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून संपूर्ण Cutoff पाहू शकता 👇
👉 Maharashtra MBBS Round 1, 2, आणि 3 Cutoff पहा

सध्या MCC AIQ Stray Vacancy Round 2025 सुरु आहे. त्यातील ताज्या अपडेट्स आणि वेळापत्रक तुम्ही खालील लिंकवर पाहू शकता 👇
👉 MCC AIQ Stray Vacancy Round 2025 Update पहा

Maharashtra MBBS BDS Stray Vacancy Round 1 2025, NEET UG 2025 Maharashtra, Stray Vacancy Schedule Maharashtra, MBBS Admission Maharashtra 2025, BDS Admission Maharashtra 2025, DMER Stray Round
शॉपिंग कार्ट